रत्नपुर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारानी बुधवारी वेरुळ येथे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजाची भेट घेवून जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीय दृष्ट्या निर्णय घेण्यासंदर्भात महत्त्वाची मीटिंग बुधवारी आयोजित केलेली होती.
या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वेरूळ येथे उपस्थिती होती यादरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उमेदवार श्री संदिपानजी भुमरे, विद्यमान खासदार इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत, अपक्ष उमेदवार जेके जाधव साहेब, अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसाट व शिर्डी मतदार संघातील अपक्ष उमेदवार श्री भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भाचे निर्णय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिनांक दहा तारखेला घेण्यात येणार असून तो निर्णय सर्व प्रसिद्धी माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल आज कुठल्याही उमेदवारा संदर्भात पाठिंबाचा निर्णय झालेला नाही असे जय बाबाजी भक्त परिवाराचे वतीने राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळविले आहे.