कराड: छत्रपती शिवाजीमहाराजांची शौर्यभूमी असलेला सातारा कोणत्याही देशभक्तासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. मिलिटरी अपशिंगे गावाने तर, शिवरायांच्या आदर्शांनुसार देशसेवेचे देदीप्यमान कार्य केले आहे. अशा शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले हे भाजपने उमेदवार दिले आहे.
साताऱ्यामध्ये पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.