उभाठा गटाचे प्रवक्ते संजय राजाराम राऊत यांनी आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांचा अपमानजनक उल्लेख करून त्यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी देण्याच्या विरोधात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्या नेतृत्वात भाजपाने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संजय राऊत यांनी अहिल्यानगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत "दफन " करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा श्री. राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांचे मा. पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसोबत उच्च मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते. अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. आम्ही निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे.