सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

होर्डिंग प्रकरणावरुन मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेदरम्यान जुंपली; 'ती' जमीन कोणाच्या मालकीची? यावरुन वाद सुरु

या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिली एफआयआर २०२३ साली मे महिन्यामध्ये दाखल केली होती.

Shruti Patil
  • May 14 2024 9:22AM

मुंबई: मुंबईमधील घाटकोपरमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पेट्रोल पंपवर पडून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ७४ जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे तर अनेकांवर घाटकोपरमधील राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता या होर्डिंग प्रकरणावरुन मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वेदरम्यान जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्या जमीनीवर होर्डिंग उभं होतं ती जमीन कोणाच्या मालकीची आहे? यावरुन वाद सुरु झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेने अपघातग्रस्त होर्डिंग ज्या जमीनीवर उभं होतं, ती जमीन आपल्या मालकीची नसल्याचं सांगत हात वर केले आहेत. ही जमीन रेल्वे पोलिसांच्या अख्त्यारीत येत असल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. तसेच मुंबई महानगर पालिका रेल्वे विरुद्ध गुन्हा दाखल करणार असून जाहिरात कंपनीविरुद्धही गुन्हा दाखल केला जाईल असं जाहीर केलं आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

मात्र महानगरपालिकेने हे स्पष्टीकरण दिल्यानंतर मध्य रेल्वेने या जागेची मालकी आपल्याकडे असल्याचा दावा फेटाळला आहे. अपघातग्रस्त होर्डिंग रेल्वेच्या जागेवर नव्हतं असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे. "हे होर्डिंग रेल्वेच्या जमीनीवर नव्हतं. या प्रकरणाशी भारतीय रेल्वेचा कोणताही संबंध नाही," असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेने एक्सवरुन (ट्वीटर) पोस्ट केलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार