सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुजरातमधील १६ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रशियातून आला ई-मेल?

या ई - मेलची गंभीर दखल घेत पोलिसांनी ज्या शाळांना हे ई - मेल आले तिथे कोंबिंग ऑपरेशन राबवले. पण यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही.

Shruti Patil
  • May 7 2024 7:54AM
गुजरात: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे रोजी देशभरात पार पडणार आहे. १२ राज्ये आणि केंद्राशासित प्रदेशातील मिळून एकूण ९४ लोकसभा मतदारसंघांत तिसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष तिसऱ्या टप्प्यात गुजरात राज्यातील सर्व २६ जागांसाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या अहमदाबादमधील १६ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून, गुजरातमध्येही मतदान पार पडणार आहे. मात्र मतदानाच्या दिवशी अहमदाबादमधील १६ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई - मेल आला आहे. त्यानुसार, अहमदाबाद शहरातील १३ शाळा आणि अहमदाबाद ग्रामीण भागातील ४ मतदारसंघातील शाळांना सकाळी ६ वाजता ई-मेल प्राप्त झाले. रशियन डोमेनवरुन त्यांना हे ईमेल आले आहेत. ‘mail.ru’ असं हे डोमेन असल्याची माहिती अहमदाबादचे पोलीस सहआयुक्त शरद सिंघल यांनी दिली. सोमवारी या शाळांना धमकीचे ई - मेल आले असून, ‘तुमच्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे’, असा मजकूर या ई- मेलमध्ये आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ई-मेलच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक अलर्टवर आले आहेत

 

या ई - मेलची गंभीर दखल घेत पोलिसांनी ज्या शाळांना हे ई - मेल आले तिथे कोंबिंग ऑपरेशन राबवले. पण यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. त्यामुळे हा धमकीचा ई - मेल म्हणजे अफवा होती, हे स्पष्ट झाले आहे. असाच काहीसा मजकूर असलेले ईमेल १ मे रोजी दिल्लीतील १५० शाळांना आले होते. त्यावेळीही तपासात काहीही निष्णन्न झाले नव्हते. सायबर क्राईम विभागात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार