सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाळासाहेबांनी आज 'यांना' जोड्याने मारले असते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी पालघरच्या मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे प्रचारसभा झाली.

Shruti Patil
  • May 14 2024 9:10AM

पालघर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी पालघरच्या मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे प्रचारसभा झाली. या मतदारसंघात ठिकाणी महायुतीचे भाजपा उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांचा मुकाबला उबाठा शिवसेनेच्या उमेदवार भारती कामडी यांच्याशी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आता उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसला जवळ केले. बाळासाहेब आज असते तर त्यांनी यांना जोड्याने मारले असते, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पालघर हा आपला बालेकिल्ला आहे. हा दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. तो आपल्याकडेच राहील. विरोधक गत अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांचे लाँचिंग करत आहेत. पण त्यांचे लॉचिंग होत नाही, असे शिंदे म्हणाले. ही निवडणूक पालघरपुरती मर्यादित नाही. ही देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे. आपल्याला नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. उमेदवार कुणाचा यापेक्षा उमेदवार महायुतीचा असल्याचे लक्षात घेऊन मतदान करायचे आहे. आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार