सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'निवडणूक खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचा हिशोब तीन वेळा तपासावा'

भारत निवडणूक आयोगाच्या दि. १८ फेब्रुवारी २०१९ नुसार खर्च निरीक्षकांनी आपला दैनंदिन खर्चाचा हिशोब ३ वेळा तपासावयाचा आहे.

Shruti Patil
  • May 6 2024 10:03AM

ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण नियमावलीतील भाग ब १ आणि भारत निवडणूक आयोगाच्या दि. १८ फेब्रुवारी २०१९ नुसार खर्च निरीक्षकांनी आपला दैनंदिन खर्चाचा हिशोब ३ वेळा तपासावयाचा आहे.

निवडणूक खर्च तपासणीचे ठिकाण सहाय्यक खर्च निरीक्षक यांचे कार्यालय, करमणूक कर शाखा, ४ था मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे असून खर्च तपासण्याची तारीख ९, १३ आणि १७ मे असून सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक खर्च तपासता येईल. सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके/देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहित वेळेत उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे.

वरीलप्रमाणे नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना ई-मेलव्दारेही लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी/ई-मेलने कळविण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये-धुळे यांनी कळविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार