सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदू राष्ट्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाचं पुन्हा मतदान करा - ह. भ. प. संग्राम बापू भंडारे पाटील

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगांव येथे राष्ट्रहित सर्वोपरि कार्यक्रमात हे. भ. प. संग्राम बापू भंडारे पाटील यांनी हिंदू राष्ट्रासाठी, काशी आणि मथुरेसाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच मतदान करण्याचे कोपरगावकरांना आवाहन केले.

Shruti Patil
  • May 7 2024 12:28PM

अहिल्यानगर (दि. ६ मे): अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे कट्टर हिंदुत्ववादी कीर्तनकार म्हणून ओळख असलेले ह. भ. प. संग्राम बापू भंडारे पाटील यांनी 'राष्ट्रहित सर्वोपरि' कार्यक्रमात हिंदूंना राष्ट्रीय हितासाठी मतदान करण्यासाठी आव्हान केले. प्रत्येक कीर्तनकार कीर्तनातून हिंदू धर्माची ठामपणे बाजू घेत नाही, पण काल ह .भ. प. संग्राम बापू भंडारे पाटील महाराजांनी हिंदूंना ठामपणे काळजाला भिडणारे आव्हान केले, की 'जर हिंदूराष्ट्र निर्माण करायचं असेल, तर पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच निवडा.'

'जो राम को लाये है, हम उनको लायेंगे' असं म्हणत काशी - मथुरेसाठी पण मोदींनाच मतदान करा, अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. १००% मतदान करण्यासाठी हिंदू अजूनही जागृत झाले नाही, तर उद्या हिंदूंवर होणाऱ्या अन्याय - अत्याचाराला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, कारण हिंदुत्ववादी पक्षाला एक हिंदू म्हणून मतदान देणे आपल्या हातात आहे, असं म्हणत त्यांनी त्यांच्या सणसणीत भाषणातून हिंदूंना हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. फक्त हिंदूच सर्वधर्मसमभाव मानतात, बाकी विशेष धर्मीय लोकं हे फक्त त्यांच्याच विचाराच्या पक्षाशी एकनिष्ठ असतात, असं म्हणत त्यांनी निद्रिस्त हिंदूंची कानउघडणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलतांना महाराज म्हणाले, की 'बोलतो मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, आवडतात मला नरेंद्र मोदी साहेब, का? कारण त्यांच्या जीवनात त्याग आहे. त्यांनी कधीही स्वतःला मिरवून घेतले नाही. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर दीदींचा अंत्यविधी झाल्यावर त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवून मुंबईतला आता दीदींचा अंत्यविधी भव्य झाला पाहिजे हे त्यांनी सर्वांना ओरडून सांगितले आणि स्वतः ते अंत्यविधीला हजर राहिले. आणि मोदींनी ज्यांच्या पोटी जन्म घेतला, त्यांची एकमेव रक्ताची जवळची व्यक्ती म्हणजे त्यांची आई ज्यावेळी देवा घरी गेल्य,  त्यावेळी मोदींनी ठरवलं असतं तर ते लतादीदींप्रमाणे भव्य त्यांच्या आईचा अंत्यविधी करू शकले असते, परंतु त्यांनी तसं न करता महानगरपालिकेच्या वैकुंठा रथातून त्यांची अंत्ययात्रा काढली. असा करणारा हा भारतातील पहिलाच पंतप्रधान असेल.'

ह. भ. प. संग्राम बापू भंडारे पाटील महाराज म्हणाले, की 'मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अभिमान वाटतो, नक्कीचं वाटतो, का? कारण शिंदे साहेब कपाळभर कुंकू लावतात म्हणून त्यांचा अभिमान वाटतो. हिंदूंची पहिली ओळख म्हणजे त्यांच्या कपाळाला टिळा पाहिजे. शिंदे साहेबांमुळे आज महाराष्ट्रातली अनेक मुलांचा आदर्श घेत आहे. आज जर आ. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांना नक्कीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिमान वाटला असता. त्यांच्यानंतर खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेचा वारसा शिंदे साहेबांनी चालवला आहे.'

तसेच ते पुढे वारकरी संप्रदायाबद्दल बोलतांना महाराज म्हणाले, की 'या विश्वात जर जातिवंत हिंदुत्व कोणी टिकवलंन असेल, तर ते आमच्या वारकरी संप्रदायांनी टिकवलं आहे. वारकरी संप्रदायाने हिंदुत्व टिकवलं आहे.'

दरम्यान त्यांनी लव्ह जिहाद, भूमी जिहाद आणि हिंदूंचे आर्थिक सक्षमीकरण यावरही त्यांचे विचार मांडले. रोज गुड मॉर्निंग, गुड नाईट ऐवजी 'जय श्रीराम, जय शिवराय' बोलण्याचे आव्हान केले. कपाळाला टिळा असणाऱ्या लोकांकडूनच हिंदूंनी खरेदी करा, व्यवसायात, उत्पादनात हिंदूंना प्राधान्य द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, छत्रपती संभाजीनगर असे या जिल्ह्यांची नामकरण होऊन देखील काही लोकं अजूनही या जिल्ह्यांची जुनीच नावे घेतात, त्यांना समजून सांगा व याचे महत्त्व पटवून द्या. नावात काय आहे? असं म्हणणाऱ्यांना सांगा, की घरी जाऊन तुमच्या वडिलांचे नाव बदलून बघा. काय वाटेल? हे तसंच आहे. अशा छोट्या - मोठ्या गोष्टींमधूनच हिंदुत्व टिकेल.

देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी, दहशतवादी वृत्तीच्या देश विरोधी शक्तींचा देशविरोधी शक्तींना समूळ नष्ट करण्यासाठी, लव्ह जिहाद, धर्मांतरण कायदा देशभर लागू करण्यासाठी, राष्ट्रहितासाठी हिंदूंनी १००% पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करावे, असे कट्टर हिंदुत्ववादी ह. भ. प. संग्राम बापू भंडारे पाटील यांनी निद्रिस्त हिंदूंना आव्हान करून जागे केले. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांना हिंदूंनी १००% मतदान करू, असा शब्द दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार