सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर आयामाचा स्तुत्य उपक्रम; दैनंदिन शास्त्रशुद्ध पूजा प्रशिक्षण वर्गाला उत्साही प्रतिसाद

विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर एवं अर्चक- पुरोहित आयामाच्या वतीने दैनंदिन पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, याच्या प्रशिक्षण वर्गाचे निःशुल्क आयोजन रविवारी 12 मे ला गोरक्षण सभेच्या संयुक्त सहकार्याने केले होते.

Shruti Patil
  • May 14 2024 1:43PM
नागपूर: विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर एवं अर्चक- पुरोहित आयामाच्या वतीने दैनंदिन पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी, याच्या प्रशिक्षण वर्गाचे निःशुल्क आयोजन रविवारी 12 मे ला गोरक्षण सभेच्या संयुक्त सहकार्याने केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दीडशेच्या वर लोकांनी नोंदणी केली आणि सव्वाशेच्यावर लोक प्रत्यक्ष सहभागी झाले. महिला पुरुष आणि लहान मुलांपासून ते निवृत्त पर्यंत सर्व प्रकारचे भाविक या वर्गात सहभागी झाले होते.

 

ज्येष्ठ महिला पुरोहित दयाताई व्याघ्र यांनी उत्तम पद्धतीने पूजा का करावी, सगळ्या पूजेची, पूजेच्या तयारीची, त्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेची व्यवस्थित माहिती दिली‌ ‌यावेळी शरयू नाईक यांनी सर्व गोष्टींचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सुरुवातीच्या माहिती दिल्यानंतर भाविकांनी आपापल्या मनातली सर्व प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्याला समाधानकारक उत्तर देण्यात आले. सर्वांच्या मनातील पूजेविषयी शंका तसेच अनेक आध्यात्मिक शंकांचे निरसन करण्यात आले. अशा वर्गाची आवश्यकता खूप होती. या वर्गात येऊन माझे मनातले प्रश्न दूर झाले आणि अशा वर्गाचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी केले पाहिजे अशी प्रतिक्रिया भाविक प्रशिक्षणार्थींनी याप्रसंगी दिली. असेच चार-पाच ठिकाणी आम्ही यासाठी पुढाकार घेऊ असे कार्यकर्ते पण समोर आले.

 

कार्यक्रमाचे संचालन रेवती सगदेव यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत उपाध्यक्ष ममताताई चिंचवडकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून विश्व हिंदू परिषदेच्या कामाची माहिती दिली. गोरक्षण सभेचे सचिव श्री प्रसन्न पातुरकर यांनी लोकांनी गाईला शिजवलेले अन्न खायला घालू नये .त्यांने त्यांची तब्येत बिघडते, असे आवाहन कळकळीने केले आणि सर्व पुरोहितांनी हा विषय आपापल्या यजमाना पर्यंत आवर्जून पोहोचवावा जनजागरण करावे असे ते म्हणाले. मंदिर आयामाचे क्षेत्र प्रमुख श्री अनिल सांबरे यांनी भविष्यात या प्रकारे विविध उपक्रम, प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाईल असे सांगितले. शरयू नाईक यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळेला या प्रशिक्षणांना सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्य भेट देण्यात आले.

 

आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याने जर मनाला शांती मिळवायची असेल तर त्याकरिता दैनंदिन पूजा पाठ केल्यास मनाला शांती मिळू शकते. पौरोहित्य या क्षेत्रात आता फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून महिला सुद्धा या क्षेत्रात कुठे कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. यादरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमादरम्यान सर्वांनी यात हिरीहिरीने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार