बीड: निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास हे 4,8, व 12 मे ला निवडणूक लेखांची तपासणी करणार आहेत, अशी माहिती निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे. 39 बीड लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांना केलेल्या खर्चाची लिखित नोंद ठेवावी लागते. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या लेखांची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडून केली जाते. यासंदर्भातले प्रशिक्षण मंगळवारी घेण्यात आलेले आहे.
उमेदवारांना नोंदवही दिलेले असून त्यांनी हा खर्च व्यवस्थित रित्या लिहिलेला आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी 4,8 व 12 मे ला निवडणूक लेखांचे तपासणी खर्च सनियंत्रण कक्ष 39 बीड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 ते सांय 5 वाजता खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास हे करणार आहेत.