सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

मिचेलच्या फटक्याने प्रेक्षक जखमी; मिचेलला हे कळताच त्याने मागितली जखमी झालेल्या चाहत्याची माफी

चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिचेल याच्याकडून सरावादरम्यान त्याच्या फटक्यामुळे त्याचा एक चाहता जखमी झाला आहे.

Shruti Patil
  • May 8 2024 10:28AM

वृत्तसंस्था: चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिचेल याच्याकडून सरावादरम्यान आपल्या फटक्याने एका चाहत्याला जखमी केले गेले आहे. तसेच त्या चाहत्याच्या महागड्या फोनचेही नुकसान झाले आहे. मात्र हे कळताच मिचेलने त्या चाहत्याची माफी मागितली तसेच त्याला ग्लव्हज भेट दिले. त्यामुळे तो चाहताही सुखावला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध २८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यापूर्वी डॅरिल मिचेल फलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी प्रेक्षकही स्टँडमध्ये उपस्थित होते. त्याचवेळी मिचेलने खेळलेला एक जोरदार शॉट एका प्रेक्षकाला जोरात लागला आणि तो वेदनेने खाली वाकला. यादरम्यान, प्रेक्षकाचा महागड्या फोनचेही नुकसान झाले. प्रेक्षकाला चेंडू लागल्याचे लक्षात येताच मिचेलने नेट्समधून त्याची आधी माफी मागितली, त्यानंतर त्याने त्याला त्याचे ग्लव्हजही भेट दिले. ते ग्लव्हज भेट मिळाल्यानंतर तो प्रेक्षकही खूप आनंदी दिसत होता. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार