सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोदावरी तुटीचे खोरे पाण्याने भरून जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी लोकसभेत पंकजा मुंडेंची गॅरंटी हवी - धनंजय मुंडे

मोदींजींची विकासाची गॅरंटी पंकजा मुंडे जिल्ह्यासाठी पूर्ण करू शकतात, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

Shruti Patil
  • May 8 2024 9:49AM
अंबाजोगाई (दि. ०७): बीड जिल्ह्यात जवळपास सात लाखापेक्षा अधिक हेक्टर शेती ही जिरायती आहे. गोदावरीचे 165 टीएमसी तुटीचे खोरे भरून काढण्याच्या प्रकल्पास महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिलेली आहे. हे तुटीचे खोरे भरून काढल्यास बीड जिल्ह्याला किमान 42 टीएमसी इतके पाणी मिळेल. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने बीड जिल्ह्यातील बहुतांश शेती ही बागायती होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे प्रस्तावित खर्च एक लाख 17 हजार कोटी इतका असून, राज्य व केंद्र सरकारच्या एकत्रित अर्थसहाय्य याचबरोबर अन्य बँकांच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी मोदींजींची विकासाची गॅरंटी पंकजा मुंडे जिल्ह्यासाठी पूर्ण करू शकतात, असा विश्वास कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
 
देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंबाजोगाई येथे आयोजित विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडे बोलत होते. 
 
सभेला उपस्थित विराट जनसमुदाय पाहून ही सभा विजयाचा संकल्प करणारी नाही तर पंकजाताईच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी आहे, असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 
 
बीड जिल्ह्याच्या नावापुढे लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसून काढण्यासाठी जिल्ह्यातील शेती जलयुक्त करणे, उस तोडणाऱ्या हातांना ऊस उत्पादक बनवणे, इथल्या लोकांना इथेच रोजगार मिळवून देणे, हे आमचे ध्येय असून, यासाठी पंकजाताईला संसदेत पाठवणे आवश्यक आहे, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
 
दरम्यान बीड जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे काम वेगाने सुरू असून, अंबाजोगाईला देखील घाटनांदूर वरून रेल्वेला जोडण्याची आमची अनेक वर्षांची मागणी सुद्धा आगामी काळात पंकजाताई या मोदींजींच्या नेतृत्वात पूर्ण करतील, अशी अपेक्षाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
 
मुंडे बंधू - भगिनीने मिळून मोदींजींना बांधला फेटा...
दरम्यान या सभेस संबोधित करण्यासाठी आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठवाड्याची ओळख असलेला खास फेटा पंकजाताई मुंडे यांनी दिला, फेटा व्यवस्थित न बसल्याचे पाहून धनंजय पुढे सरसावले व तो फेटा धनंजय मुंडे यांनी बांधून व्यवस्थित बसवून दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार